शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम निकाल

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी)

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. १६ फेब्रु, २०२० अंतरिम निकाल


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १६ फेब्रुवारी, २०२० रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल शुक्रवार, दि. ०९ ऑक्टोबर, २०२० रोजी सायं. ०६.०० वाजता www.mscepune.in व https://puppss.mscescholarshipexam.in किंवा https://puppss.mscescholarshipexam.in/InterimResultLiveFeb20 या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.


विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. ०९ ऑक्टोबर, २०२० ते २० ऑक्टोबर, २०२० या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी / ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी दि. २०/१०/२०२० पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.


विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

निकाल कसा पाहावा यासाठी खालील Watch Video बटनवर क्लिक करा..

शिष्यवृत्ती परीक्षेच्या Online Test तयारीसाठी खाली दिलेल्या बटनवर Click करा.

Share This

1 thought on “शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम निकाल”

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.