शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल – 2020 । शिष्यवृत्ती परीक्षा 2020 गुणवत्ता यादी

पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी), दि. १६ फेब्रुवारी, २०२० अंतिम निकाल व गुणवत्ता यादी बाबतची संक्षिप्त माहिती

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत रविवार दि. १६ फेब्रुवारी, २०२० रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादी गुरुवार दि. १२ नोव्हेंबर, २०२० रोजी 03:00 वाजता परिषदेच्या www.mscepune.inhttp://puppss.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

दि. १६ फेब्रुवारी, २०२० रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल दिनांक ०९/१०/२०२० रोजी जाहीर करण्यात आला होता. दि. ०९/१०/२०२० ते २०/१०/२०२० या कालावधीत गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाईन मागविण्यात आले होते. परिषदेकडे विहीत मुदतीत ऑनलाईन आलेल्या परिपूर्ण अर्जावरून संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणांची पडताळणी करून गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी (शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची यादी) तयार करण्यात आली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा 2020 गुणवत्ता यादी

अंतिम निकाल प्राप्त करणे –

अंतिम निकाल परिषदेच्या www.mscepune.inhttp://puppss.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास वैयक्तिकरित्या स्वत:चा बैठक क्रमांक टाकून पाहता येईल. तसेच शाळेस त्यांच्या लॉगीनमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येईल.

संकेतस्थळावरील प्रसिध्द करण्यात आलेली शिष्यवृत्तीथारक विद्यार्थ्यांची माहिती, तसेच इतर अनुषंगिक माहितीच्या Links खालीलप्रमाणे

१. अंतिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी)

२. गुणवत्ता यादी (राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय / तालुकास्तरीय)

३. शाळा सांख्यिकीय माहिती (जिल्हानिहाय / तालुकानिहाय)

विद्यार्थी, पालक, शाळा, क्षेत्रिय अधिकाऱ्यांना वरीलपैकी कोणत्याही हव्या असलेल्या लिंकवर क्लिक करून माहिती प्राप्त (DOWNLOAD) करून घेता येईल.

शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल

• गुणवत्ता यादीत कोणाचा समावेश नाही,

१. शासनमान्य मंजूर शिष्यवृत्ती संचांची संख्या मर्यादित असल्याने कटऑफ शेकडा गुणांइतके एकूण शेकडा गुण मिळूनही प्रचलित निकषांची पूर्तता न करणारे विद्यार्थी.

२. मान्यताप्राप्त नसलेल्या शाळांमधून (अनधिकृत शाळांमधून) परीक्षेस प्रविष्ठ झालेले विद्यार्थी.

३. विहीत कमाल वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी.

४. परीक्षेतील गैरप्रकारात समाविष्ट विद्यार्थी.

५. आवेदनपत्र न भरता परीक्षेस ऐनवेळी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांपैकी शुल्क न भरलेले विद्यार्थी.

• गुणपत्रक / प्रमाणत्रांच्या डिजीटल प्रतीसंबंधी-

१. परिषदेने संकेतस्थळावर अंतरिम (तात्पुरते) गुणपत्रक दिनांक ०९ आक्टोबर २०२० रोजी व अंतिम गुणपत्रक / प्रमाणपत्राची डिजीटल प्रत गुरुवार दि. १२ नोव्हेंबर, २०२० रोजी उपलब्ध करून दिलेली आहे.

२. शाळेने विद्यार्थ्यांच्या सदर गुणपत्रक / प्रमाणपत्रांच्या डिजीटल प्रती डाऊनलोड करून सॉफ्टकॉपीच्या स्वरूपात आपल्या दप्तरी कायमस्वरूपी जतन करून ठेवाव्यात व विद्यार्थी / पालकांच्या मागणीनुसार उपलब्ध करून द्याव्यात.

• महत्त्वाचे

1. कमी करून १. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून रद्द झालेल्या प्रश्नांचे गुण उर्वरित अचूक प्रश्नांच्या प्राप्त गुणांवरून शेकडा गुण काढण्यात येतात. सदर एकूण शेकडा गुणांवरून गुणवत्ता याद्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत.

२. ऑनलाईन आवेदनपत्रात चुकीची / खोटी माहिती भरून शिष्यवृत्ती अर्हता प्राप्त झाल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळा प्रमुखांविरूध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल. तसेच अशा विद्यार्थ्यांची अर्हता रद्द केली जाईल.

३. शिष्यवृत्ती रक्कम प्रदान करण्याबाबत मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक ), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे गुणवत्ता यादीतील संबंधित विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात येत आहे. शिष्यवृत्ती रकमेबाबतचा यापुढील पत्रव्यवहार त्यांचे कार्यालयाकडेच करण्यात यावा.

हे प्रसिध्दीपत्रक परिषदेच्या www.mscepune.in व http://puppss.mscescholarshipexam.in संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात येत आहे.

निकाल कसा पाहावा यासाठी खालील Watch Video बटनवर क्लिक करा..

शिष्यवृत्ती परीक्षेच्या Online Test तयारीसाठी खाली दिलेल्या बटनवर Click करा.

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.