दहा अंकांपर्यंतच्या संख्याचे वाचन व लेखन

आता आपण ‘दहा अंकांपर्यंतच्या संख्याचे वाचन व लेखनReading and writing numbers up to ten digits’ हा  घटक पाहणार आहोत.

Notes

दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन वाचा व समजून घ्या : 

1) दहा अंकी संख्यांचे वाचन व लेखन : 4,75,31,52,689 ही दहा अंकी संख्या ‘ चार अब्ज पंचाहत्तर कोटी एकतीस लक्ष बावन्न हजार सहाशे एकोणनव्वद ‘ अशी वाचतात .  म्हणजे दहा अंकी संख्येचे वाचन करताना दशकोटी व कोटी ; दशलक्ष व लक्ष ; दशहजार व हजार या स्थानांवरील अंक एकत्र वाचतात . 

2) संख्यावाचन सुलभ व अचूक व्हावे यासाठी स्वल्पविराम घालून अंकांचे गट पाडतात . 

उदा . , 5,27,43,89,135 ; 27,35,24,261 . 

3) स्वल्पविराम देताना प्रथम उजवीकडून डावीकडे पहिले तीन अंक ( म्हणजे शतक स्थानापर्यंतचे अंक ) सोडून स्वल्पविराम देतात , त्यानंतर दोन – दोनच्या गटानंतर स्वल्पविराम देतात , उदा . , 8,25,71,36,448 ; 31,22,67,569 . 

10 एकक -1 दशक ,

10 दशक -1 शतक ,

10 शतक- 1 हजार ,

10 हजार -1 दशहजार ,

10 दशहजार -1 लक्ष,

10 लक्ष -1 दशलक्ष ,

10 दशलक्ष -1 कोटी ,

10 कोटी = 1 दशकोटी,

 10 दशकोटी -1अब्ज

✳⭐⭐⭐⭐⭐⭐⭐✳

Notes

  Reading and writing numbers ( up to Ten digit)

10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन

1 – One ( एकक)

10 – Ten ( दशक)

100 – Hundred (शतक)

1,000 – Thousand (हजार)

10,000 – Ten thousand (दश हजार)

1, 00,000 – Lakh (लक्ष)

10,00,000 – Ten Lakh(दशलक्ष)

1,00,00,000- crore (कोटी)

10,00,00,000 – Ten crore (दश कोटी)

1,00,00,00,000 – Abja (अब्ज)

वरील नोट्स लिहुन व समजुन घ्या

खाली विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर नक्की द्या.

Question …

How is the number six thousand written in figures?

सहा हजार ही संख्या  अंकात कशी लिहाल?

 पर्याय  [Option]

a] 6,00,000              b] 600                     c]6,000                   d]60,000

संकलन – सतीश चिंधालोरे

S A N S K A R M A T H S C L U B

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.