Number System

या लेखात आपल्याला संख्याज्ञान गे घटक समजाऊन दिले आहे.

नैसर्गिक संख्या म्हणजे काय ?

सुरूवातीला संख्या मापणात…

1,2,3,4….  चा वापर केला गेला.

नैसर्गिक रित्या आपण मापण करत या संख्या शोधल्या म्हणून यांना मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या म्हणतात.

सर्वात लहान नैसर्गिक संख्या = 1

सर्वात मोठी नैसर्गिक संख्या – सांगता येत नाही.

या नंतर आपण पाहुयात….

पूर्ण संख्या म्हणजे काय ?

नंतर मानवाने (0) शून्य शोधले.

काहीच नाही म्हणजे  शून्य .

हे नैसर्गिक संख्या च्या सुरूवातीला लिहले जावू लागले.

नविन संख्या संच तयार झाला.

(0, 1, 2, 3, 4,……..) यालाच पूर्ण संख्या म्हणतात*

सर्वात लहान नैसर्गिक संख्या – 1

सर्वात लहान पूर्ण संख्या –  0

नंतर आपण पाहुयात….

पूर्णांक  संख्या म्हणजे काय ?

यांनंतर मानवाला….

6 – 9 = ?

5 – 7 = ? 

हे उत्तर लिहताना  *ऋण संख्या (negative numbers) ची आवश्यकता वाटली.

यातूनच …. (…-3 , -2, -1 , 0  , 1, 2, 3…..) संख्या संच उदयास आल्या.

यालाच पूर्णांक संख्या (whole numbers) संच म्हणतात

लक्षात ठेवा :

सर्व ऋण संख्या शून्य पेक्षा लहान असतात व 

सर्व धन संख्या शून्य पेक्षा मोठ्या असतात…

वर वाचलेल्या माहितीच्या आधारे खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर सांगा.

प्रश्न : (-5) व (-20) यांत लहान संख्या कोणती?

संकलन – सतीश चिंधालोरे

S A N S K A R M A T H S C L U B

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.