घटक : वेगळे पद शोधा : Level 2
* एखादी आकृती वेगळी किंवा वेगळे पद ठरवण्यासाठी पुढीलपैकी कोणतीही शक्यता तपासून पाहावी :
1. आकृतीत जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल, तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे.
2. एकात एक अशा दोन वा तीन आकृत्या असतील, तर आधी बाहेरच्या आकृत्यांची तुलना करावी. मग आतील आकृत्यांची तुलना करावी.
3. सर्व आकृत्यांचे दोन समान भाग करता येतात. एका आकृतीचे मात्र असे दोन समान भाग करता येत नाहीत.
4. आकृतीमधील दोन चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात.
5. चित्रांमध्ये वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन उपयोगी पडते.