★ विषय भाषा ★
घटक :- 1 ला :- उतारा व उताऱ्यावरील प्रश्न
खालील माहिती जाणून घ्या.
★ उतारा लक्षपूर्वक वाचा. ★उताऱ्यातील आशय समजून घ्या
★ उताऱ्यातील शब्दांचे अर्थ नीट नीट समजून घेऊन वाक्य पुन्हा पुन्हा वाचा.
★ उताऱ्यातील प्रसंग वर्णन संवाद घटना इत्यादी मागील कार्यकारण भाव समजून घ्या.
★ उताऱ्यातील माहितीच्या क्रमाने प्रश्नांचे क्रम असतीलच असे नाही.
★ उतारा वाचून उत्तरे नोंदविताना चारही पर्याय लक्षपूर्वक वाचावं योग्य पर्याय निवडा.
★ उत्तराचा पर्याय क्रमांक निवडताना उताऱ्यातील तेवढा भाग पुन्हा वाचून अचूक पर्यायाची खात्री करून घ्या.
वरील प्रमाणे माहिती लक्षात ठेवून आपल्या पाठ्यपुस्तकातील उतारा वाचा वरील मुद्दे लक्षात ठेवून शिक्षक प्रश्न बनवून देतील अथवा आपण स्वतः 10 प्रश्न बनवा, आणि त्याचे उत्तरे सोडवा.
उपघटक :- 2 :- वृत्तपत्रातील जाहिरात व बातम्यांवर आधारित प्रश्न
खालील माहिती जाणून घ्या.
दैनंदिन व्यवहारात वर्तमानपत्र या माध्यमातून आपण विविध प्रकारच्या बातम्या तसेच जाहिराती वाचत असतो त्यातून व्यक्त होणारा आशय संदर्भ संदेश समजून घेणे महत्त्वाचे असते.
हे जाणून घ्या
★ प्रथम जाहिरात बातमी लक्षपूर्वक वाचा.
★ जाहिरात बातमी चा विषय समजून घ्या.
★ स्थळ, काळ इत्यादी बाबी जाणीवपूर्वक समजून घ्या.
★जाहिरात बातमी यातून व्यक्त होणारा संदेश समजून घ्या.
★तर्काने अंदाजाने योग्य अर्थ लावण्याचा प्रयत्न करा.
वरील प्रमाणे माहिती लक्षात ठेवून आपल्या वर्तमानपत्रातील जाहिरात वाचा वरील मुद्दे लक्षात ठेवून शिक्षक प्रश्न बनवून देतील अथवा आपण स्वतः 10 प्रश्न बनवा, आणि त्याचे उत्तरे सोडवा.
भाग 2 :-कार्यात्मक व्याकरण
उपघटक :-शब्दांच्या जाती (नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद.)
1. नाम:-
प्रत्यक्ष अथवा काल्पनिक वस्तूच्या नावास किंवा गुणधर्म दर्शविणाऱ्या शब्दाला “नाम” असे म्हणतात.
उदा.:- उदा. गोविंद, घोडा, आंबा, गंगा, पुस्तक, दूध, भारत, गहू, प्रामाणिकपणा, अप्सरा.
2) सर्वनाम :-
एकाच नामाचा उच्चार वारंवार होऊ नये म्हणून नामाबद्दल जो शब्द वापरतात त्याला “सर्वनाम” असे म्हणतात.
उदा. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, त्या, जो, जी, ज्या, हा, ही, ह्या, हे, ज्याने, त्याने, आपण, आम्हास, आम्हाला, तुम्हांला.
3) विशेषण :-
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला “विशेषण” असे म्हणतात.
उदा.:- बलाढ्य, आळशी, हिरवी, उंच, धारदार, कडू, सुगंधी, इमानी, कर्कश, टपोरे, पाच, दुप्पट.
4) क्रियापद :-
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला “क्रियापद” असे म्हणतात.
उदा. आहे, नाही, सांगितले, म्हणतात, बोलतो, खेळतात, नांगरतो, खातो, तोडतो, लिहितो.
वरील सर्व उपघटकावर आधारित किमान 10 प्रश्नांची निर्मिती करावी व उत्तरे सराव करावा, आपणास येत्या शनिवारी या घटकावर आधारित प्रश्न विचारले जातील, त्यासाठी एक लिंक दिली जाईल, त्या लिंकवर पेपर मिळेल, तो सोडवावा.
संकलन : सतीश चिंधालोरे