पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त – प्रश्नमंजुषा स्पर्धा
14 नोव्हेंबर हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त संपूर्ण भारतभर ‘बालकदिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या महत्वपूर्ण दिनाचे औचित्य साधून जि. प. डिजिटल पब्लिक स्कूल, खराशीच्या वतीने ही प्रश्नमंजूषा आयोजित केलेली आहे.
श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे काश्मिरी पंडितांच्या घरी नोव्हेंबर १४, इ.स. १८८९ रोजी झाला. फेब्रुवारी ७, इ.स. १९१६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला. इ.स. १९१७ साली त्यांना इंदिरा प्रियदर्शिनी ही कन्या झाली. जवाहरलाल यांचे पिता मोतीलाल नेहरू यांचे फेब्रुवारी ६, इ.स. १९३१ रोजी व पत्नी श्रीमती कमला नेहरू यांचे फेब्रुवारी २८, इ.स. १९३६ रोजी निधन झाले.
