Daily Current affairs General Knowledge Question Bank
सामान्यज्ञान प्रश्नमालिका
Sanskarmaths च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो. Daily Current affairs General Knowledge Question Bank या विभागात आम्ही स्पर्धा परीक्षांसाठी भारतीय इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राजकारण व घटना, बँकिंग, संस्था, पर्यावरण, क्रीडा, भारतीय संस्कृती इ. सारख्या विविध स्थिर सामान्य अभ्यासाच्या विषयांवर दररोज 10 ते 15 जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे पोस्ट करतो.
सदर जनरलनॉलेज मधील प्रश्न प्रज्ञाशोध परीक्षा, सैनिकी स्कुल, अशा विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी दररोजचे General Knowledge Question Bank (सामान्यज्ञान प्रश्नमालिका) पाहावी, प्रश्न वहीत लिहून ठेवावे आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.
धन्यवाद
Daily Current affairs General Knowledge Question Bank – 10
प्रश्न 1 : ‘यंग इंडिया’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते ?
उत्तर – महात्मा गांधी.
प्रश्न 2 : ‘फ्रेंच ओपन २०१३’ चे पुरूष गटाचे एकेरी विजेतेपद कोणी पटकावले ?
उत्तर – राफेल नदाल.
प्रश्न 3 : भारतातील सर्वांत मोठे तारघर कोठे आहे ?
उत्तर – मुंबई.
प्रश्न 4 : स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण आहे ?
उत्तर – लॉर्ड रिपन.
प्रश्न 5 : संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान कोणते आहे ?
उत्तर – देहू.
प्रश्न 6 : ‘वेस्टर्न ब्लॉट’ ही चाचणी कोणत्या आजाराशी संबंधित आहे ?
उत्तर – एड्स.
प्रश्न 7 : आशियाई विकास बॅंकेचे मुख्यालय कोठे आहे ?
उत्तर – मनिला.
प्रश्न 8 : साफ्टा करार कोणत्या संघटनेशी संबंधित आहे ?
उत्तर – सार्क.
प्रश्न 9 : आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत ?
उत्तर – केशवसूत.
प्रश्न 10 : मोसंबीसाठी महाराष्ट्रातील कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे ?
उत्तर – श्रीरामपूर.
आपले जनरल नॉलेज तपासा. खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर Comment करा.
आजचा प्रश्न : रूपया हे नाणी सर्वप्रथम कोणी सुरू केले ?
आजच्या प्रश्नाचे उत्तर पुढील अंकात मिळेल.
येणार्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावासाठी sanskarmaths.in टेस्ट सिरीस सुरु कस्त आहे. यासाठी आपण सर्व सामान्यज्ञान प्रश्नमालिका सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन सामान्यज्ञान प्रश्नमालिका सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ, तेव्हा रोज भेट देत रहा sanskarmaths.in ला. मित्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही..