सहभाग प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध
दिनांक ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये शासनाच्या वतीने राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी “बालदिवस सप्ताह” साजरा करण्यात आला होता. यानुषंगाने जिल्हास्तरावर ऑनलाईन प्रणालीचे लॉगिन देऊन तालुकास्तर व जिल्हास्तरावरील कामकाज पूर्ण करणेसाठी सूचित करण्यात आले होते.
यानुसार बालदिवस सप्ताह अंतर्गत विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थ्यांसाठी सहभाग प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
यासाठी https://covid19.scertmaha.ac.in/baldiwascert/studentlist.aspx या लिंकवर क्लिक करून सहभागी विद्यार्थी यांनी यापूर्वी प्रणालीमध्ये नोंदविलेला आपला मोबाईल क्रमांक टाकून उपक्रमनिहाय आपले सहभाग प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकतात.
अधिक माहितीसाठी सोबतच्या पत्राबरोबर देण्यात आलेल्या मार्गदर्शक प्रपत्रामध्ये दिल्यानुसार विद्यार्थी आपले सहभाग प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकतील.