इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – आकलन – भाषाज्ञान -ऑनलाईन टेस्ट 7
थोडक्यात माहिती :
आकलन भाषाज्ञान’ या उपघटकात पुढील विविध घटकांसंबंधित प्रश्न विचारतात.
1) एका शब्दापासून अनेक अर्थपूर्ण शब्द बनवणे.
2) अक्षरसमूहापासून अर्थपूर्ण शब्द बनवणे.
3) शब्दसमूहासाठी एकच शब्द.
4) समानार्थी / विरुद्धार्थी शब्द.
5) इंग्रजी शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द. इंग्रजी शब्दातील अक्षरांपासून बनणारे शब्द.
7) वाक्प्रचार व म्हणी.
(8) शब्दांचा अकारविल्हे क्रम.
(9) शब्दांच्या जाती-नाम, सर्वनाम, विशेषण इत्यादी.
(10) लिंग, वचन.
(11) विरामचिन्हे.
(12) साहित्यिक, त्यांची टोपणनावे, त्यांची पुस्तके.
(13) वर्ण प्रकार – अनुनासिके.
संक्षिप्त माहिती सांगायची झाल्यास हेच कि, यातील प्रश्न सोडवण्यासाठी भाषेचे, त्यातील शब्दांचे ज्ञान असले पाहिजे.
उपयुक्त माहिती :
(1) पाठ्यपुस्तकातील पाठांचे तसेच भाषेच्या व्याकरणाच्या पुस्तकाचे बारकाईने वाचन केल्यास विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवणे सोपे जाते.
(2) वर्णमाला, बाराखडी, वर्णांचे प्रकार लक्षात ठेवावेत.
(3) शब्दांचा अकारविल्हे क्रम लावताना अक्षरांचे वर्णमालेतील (तसेच बाराखडीतील) स्थान लक्षात घ्यावे. नंतर क्रमाने इतर अक्षरांचे स्थान लक्षात घ्यावे.
(4) दोन वा अधिक शब्दांच्या समूहासाठी एकच जोडशब्द वापरतात. उदा., ‘ तहान आणि भूक’ = तहानभूक, प्रत्येक दिवशी = प्रतिदिन.
(5) पाठ्यपुस्तकातील (भाषा) साहित्यिकांची माहिती अभ्यासावी.
(6) मराठी महिने व ऋतू, समूहदर्शक शब्द, प्राण्यांचे ध्वनी, प्राण्यांची पिल्ले, वस्तूंचे ध्वनी वगैरेंचा
अभ्यास करून शब्दभांडार वाढवावे.
टेस्ट सोडविण्यासाठी शुभेच्छा!