इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – आकलन भाषाज्ञान – ऑनलाईन टेस्ट क्र. 6

इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – आकलन – भाषाज्ञान -ऑनलाईन टेस्ट 6

थोडक्यात माहिती :

आकलन भाषाज्ञान’ या उपघटकात पुढील विविध घटकांसंबंधित प्रश्न विचारतात.

1) एका शब्दापासून अनेक अर्थपूर्ण शब्द बनवणे.

2) अक्षरसमूहापासून अर्थपूर्ण शब्द बनवणे.

3) शब्दसमूहासाठी एकच शब्द.

4) समानार्थी / विरुद्धार्थी शब्द.

5) इंग्रजी शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द. इंग्रजी शब्दातील अक्षरांपासून बनणारे शब्द.

7) वाक्प्रचार व म्हणी.

(8) शब्दांचा अकारविल्हे क्रम.

(9) शब्दांच्या जाती-नाम, सर्वनाम, विशेषण इत्यादी.

(10) लिंग, वचन.

(11) विरामचिन्हे.

(12) साहित्यिक, त्यांची टोपणनावे, त्यांची पुस्तके.

(13) वर्ण प्रकार – अनुनासिके.

संक्षिप्त माहिती सांगायची झाल्यास हेच कि, यातील प्रश्न सोडवण्यासाठी भाषेचे, त्यातील शब्दांचे ज्ञान असले पाहिजे.

उपयुक्त माहिती :

(1) पाठ्यपुस्तकातील पाठांचे तसेच भाषेच्या व्याकरणाच्या पुस्तकाचे बारकाईने वाचन केल्यास विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवणे सोपे जाते.

(2) वर्णमाला, बाराखडी, वर्णांचे प्रकार लक्षात ठेवावेत.

(3) शब्दांचा अकारविल्हे क्रम लावताना अक्षरांचे वर्णमालेतील (तसेच बाराखडीतील) स्थान लक्षात घ्यावे. नंतर क्रमाने इतर अक्षरांचे स्थान लक्षात घ्यावे.

(4) दोन वा अधिक शब्दांच्या समूहासाठी एकच जोडशब्द वापरतात. उदा., ‘ तहान आणि भूक’ = तहानभूक, प्रत्येक दिवशी = प्रतिदिन.

(5) पाठ्यपुस्तकातील (भाषा) साहित्यिकांची माहिती अभ्यासावी.

(6) मराठी महिने व ऋतू, समूहदर्शक शब्द, प्राण्यांचे ध्वनी, प्राण्यांची पिल्ले, वस्तूंचे ध्वनी वगैरेंचा

अभ्यास करून शब्दभांडार वाढवावे.

टेस्ट सोडविण्यासाठी शुभेच्छा!

0%

इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी - आकलन (भाषाज्ञान) - ऑनलाईन टेस्ट क्र. 6

सुचना : 1) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

1 / 10

प्रश्न : 'तम चिरत चमकल्या चपला, वन्ही लोळ-अवनी उतरला.' या ओळीत पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ?

2 / 10

प्रश्न : (अ) सतत बोलून त्याचे तोंड दुख लागले (ब) ताजमहालचे साँदर्य पाहून त्याने तोडाचा 'आ' वासला. (क) चोराच्या पाठीमागे धावून धावून पोलिसाच्या तोंडाला फेस आला. (ड) आपली कारस्थाने उघड होताच त्याने तिथून तोंड काळे केले .'तोंडाला होणार्या वेदना' हा अर्थ वरीलपैकी कोणत्या वाक्यात अभिप्रेत आहे ?

3 / 10

प्रश्न : 'वृंद , पुंज, काफिला, ताटवा, बन' या शब्दांमध्ये पुढीलपैकी कोणत्या शब्दासाठी समूहदर्शकशब्द आलेला नाही ?

4 / 10

प्रश्न : 'सल्लामसलत' या शब्दातील अक्षरांपासून पुढीलपैकी कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही ?

5 / 10

प्रश्न : "अंधार पडल्यावर सर्वजण आमच्या घरी आले आणि दुःख व्यक्त करून गेले. या वाक्यात पुढीलपैकी कोणते अक्षर लघु आहे ?

6 / 10

प्रश्न : 'वनात एकीकडे गुंजारव, केकारव अन् कलरव तर दुसरीकडे घूत्कार अन् गर्जना ऐकू येत होत्या."या वाक्यातून वनात राहणाच्या कोणत्या सजीवाचा बोध होत नाही?

7 / 10

प्रश्न : 'अलिकडे कुणा बुवाच्या आशिर्वादाने तो कोटयधीश फारच अध्यात्मिक बडबड करू लागला आहे 'या वाक्यातील कोणता शब्द शुद्ध स्वरूपात आला आहे ?

8 / 10

प्रश्न : 'त्या जोडप्यातील दोघांची दृष्टी आठवडाभर आपल्या हरवलेल्या माणसाचा शोध घेत होती या वाक्यातील कोणता शब्द अनेकवचनी आहे ?

9 / 10

प्रश्न : " वा ! किती छान चित्र ! " मनोहर म्हणाला. "वाटतं, आपण खरंच नदीकाठावर बसलो आहोत . " या वाक्यात किती वेळा विरामचिन्हे आली आहेत ?

10 / 10

प्रश्न : खळखळाट, किणकिणाट, छनछनाट, खणखणाट यांमध्ये पुढीलपैकी कोणत्या वस्तूचा ध्वनी आलेला नाही ?

Your score is

0%

Exit

चाचणीला Rate जरूर द्या आणि आपणास चाचणी कशी वाटली? ते नक्की सांगा. 

इतर विषयांच्या ऑनलाईन टेस्ट खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा.

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.