इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – आकलन – सूचनापालन (भाग 3) ऑनलाईन टेस्ट
आपली इंद्रिये आजूबाजूच्या परिसरातून सतत काही ना काही अनुभव घेत असतात. या अनुभवातून ग्रहण केलेल्या माहितीतून मेंदू विविध अर्थ काढत असतो. योग्य अर्थ काढण्यासाठी माहिती अचूकपणे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. समजून घेण्याची ही प्रक्रिया म्हणजेच आकलन (Assessment). आकलन करण्यात चूक झाली तर अर्थ व निष्कर्ष काढण्यात चूक होते. यामुळे घेतलेले निर्णयही चुकतात.
विद्यार्थ्यांची हीच आकलनक्षमता तपासणारे प्रश्न या घटकामध्ये विचारले जातात. प्रश्नात दिलेल्या माहितीचे व सूचनेचे आकलन करून, योग्य कृती करून विदयार्थ्याने उत्तरापर्यंत पोहोचणे अपेक्षित असते.
‘आकलन – सूचनापालन’ या घटकावर शिष्यवृत्ती परीक्षेत किमान 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. आपला या घटकाचा चांगला सराव व्हावा म्हणून सदर इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – आकलन – सूचनापालन (भाग 3) ऑनलाईन टेस्ट पुरविली आहे. त्यासाठी हि टेस्ट जरूर सोडवा.
टेस्ट सोडविण्यासाठी शुभेच्छा!