इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – आकलन सूचनापालन – ऑनलाईन टेस्ट क्र. 2

इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – आकलन – सूचनापालन (भाग 2) ऑनलाईन टेस्ट

आपली इंद्रिये आजूबाजूच्या परिसरातून सतत काही ना काही अनुभव घेत असतात. या अनुभवातून ग्रहण केलेल्या माहितीतून मेंदू विविध अर्थ काढत असतो. योग्य अर्थ काढण्यासाठी माहिती अचूकपणे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. समजून घेण्याची ही प्रक्रिया म्हणजेच आकलन (Assessment). आकलन करण्यात चूक झाली तर अर्थ व निष्कर्ष काढण्यात चूक होते. यामुळे घेतलेले निर्णयही चुकतात.

विद्यार्थ्यांची हीच आकलनक्षमता तपासणारे प्रश्न या घटकामध्ये विचारले जातात. प्रश्नात दिलेल्या माहितीचे व सूचनेचे आकलन करून, योग्य कृती करून विदयार्थ्याने उत्तरापर्यंत पोहोचणे अपेक्षित असते.

‘आकलन – सूचनापालन’ या घटकावर शिष्यवृत्ती परीक्षेत किमान 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. आपला या घटकाचा चांगला सराव व्हावा म्हणून सदर इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – आकलन – सूचनापालन (भाग 2) ऑनलाईन टेस्ट पुरविली आहे. त्यासाठी हि टेस्ट जरूर सोडवा.

टेस्ट सोडविण्यासाठी शुभेच्छा!

0%

इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी - आकलन (सूचनापालन) - ऑनलाईन टेस्ट क्र. 2

सुचना : 1) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

1 / 10

प्रश्न : 'मंगळयान हे भारताच्या तंत्रज्ञान प्रगतीतील एक मानाचे पान आहे' या वाक्याच्या सुरुवातीपासून सहाव्या शब्दाच्या डावीकडील चौथ्या शब्दाच्या उजवीकडील दुसरा शब्द कोणता आहे ?

2 / 10

प्रश्न : 'प्रसिद्धिपराङ्मुख' या शब्दातील डावीकडून चौथ्या व उजवीकडून तिसऱ्या स्थानावर असलेली अक्षरे कोणती ?

3 / 10

प्रश्न : 'भगवद्गीता' या शब्दातील उजवीकडून दुसऱ्या अक्षराच्या डावीकडील तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडील लगतचे अक्षर कोणते ?

4 / 10

प्रश्न : 'पूर्व दिशेकडून सूर्याची कोवळी किरणे भूईला स्पर्शून गेली आणि पाने फुले चैतन्याने बहरून आली.' या वाक्यात ऊकारान्त अक्षरे किती आहेत ?

5 / 10

प्रश्न : गोजिरवाणे' या शब्दातील कोणत्या क्रमांकांच्या अक्षरांपासून एका राज्याचे नाव तयार होते ?

6 / 10

प्रश्न : 'पुष्पसृष्टीतल्या त्या चिमुकल्या विमानाच्या नृत्याने माझे स्वागत झाल्यामुळे मी अक्षरशः .हरखून गेलो.' या वाक्यात किती जोडाक्षरे आहेत ?

7 / 10

प्रश्न : गाडी स्टेशनवरून सुटली आणि मी तिला पकडण्यासाठी वेड्यासारखी धावत सुटले.'या वाक्यात किती ईकारान्त शब्द आले आहेत ?

8 / 10

प्रश्न : "विचारपूस' या शब्दांतील अक्षरांपासून पुढीलपैकी कोणता शब्द तयार होत नाही ? (अचूक असलेले दोन पर्याय निवडा.)

9 / 10

प्रश्न : पावसाळी ऋतू सुरू झाल्यावर बेडकांनी आपली मैफिल जमवली आणि ते डराव डराव असे सुर आळवू लागले.' या वाक्यात चार अक्षरी शब्दापेक्षा तीन अक्षरी शब्द कितीने जास्त अथवा कमी आहेत?

10 / 10

प्रश्न : सत्याविण नाही धर्म तो रोकडा। जनांशी वाकडा। मतभेद॥ ॥सत्य सोडू जाता वादामध्ये पडे। बुद्धीस वाकडे। जन्मभर ॥ या ओळींमध्ये किती अक्षरी शब्द सर्वाधिक आहेत ?

Your score is

0%

Exit

चाचणीला Rate जरूर द्या आणि आपणास चाचणी कशी वाटली? ते नक्की सांगा. 

इतर विषयांच्या ऑनलाईन टेस्ट खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा.

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.