पारदर्शी आरसा कसा तयार करतात ?

आपण अनेक डिटेक्टिव्ह चित्रपटांमध्ये पाहतो, की पोलीस एका खोलीत बसलेले असतात. त्यांना समोरच्या काचेतून पलीकडच्या खोलीत काय चाललं आहे हे स्पष्ट दिसतं; पण त्या पलीकडच्या खोलीत बसलेल्या गुंडांना मात्र त्या काचेच्या ठिकाणी एक आरसाच दिसतो व त्यात त्यांचीच प्रतिबिंब स्पष्टपणे उमटलेली असतात, साहजिकच पोलिसांना त्या गुंडांच्या सर्व कारवायांचा व्यवस्थित छडा लागतो. या प्रकारच्या काचेला वनवे मिरर म्हणतात. वास्तविक हे नाव किंवा पारदर्शी आरसा है नावही योग्य असा एकतर्फी आरसा मुळी बनवताच येत नाही. मग त्या चित्रपटांमध्ये दाखवतात ते खोट किंवा काल्पनिकच असतं की काय? तर तस नाही. कारण कोणताही आरसा त्यावर पडलेल्या प्रकाशकिरणांपैकी बहुतांश किरण परावर्तित करत असला, तरी त्यातले काही किरण त्यातून पलीकडे जातातच.

कोणत्याही पदार्धाचा हा गुणधर्मच आहे. आपण नेहमी जे आरसे वापरतो त्यांच्या पाठच्या बाजूला काळ्या किंवा शेंदरी रंगाचं जे लिंपण लावलेलं असतं त्यामुळे मग पलीकडे जाणाऱ्या किरणांना थोपवलं जातं; पण तसं न करता अशा काचेचं पार्टिशन दोन खोल्यांमध्ये लावून पलीकडच्या खोलीत संपूर्ण काळोख केला जातो आणि अलीकडच्या खोलीत भरपूर उजेड पडेल अशा व्यवस्था केली जाते.

त्यामुळे अलीकडच्या खोलीतला प्रकाश काही प्रमाणात तरी पलीकडे पोहोचतो. साहजिकच मग या खोलीतल्या वस्तू तिथं स्पष्ट दिसतात; पण बहुतांश प्रकाश परावर्तित होत असल्यामुळे अलीकडच्या वस्तूचं प्रतिबिंब दिसतं. पलीकडच्या खोलीतल्या काळोखामुळं मुळातच तिथं कमी प्रकाश असतो. त्यातला काही अंश जरी अलीकडच्या खोलीत पोहोचला तरी तो पुरेसा नसतो. त्यामुळे तिथं काही आहे याचा पत्ताच लागत नाही. रेल्वेच्या एसी डब्यांमध्ये बसलेल्या व्यक्तीला प्लॅटफॉर्मवर व्यक्ती स्पष्ट दिसते; पण त्या फलाटावरच्या व्यक्तीला त्या काचेला डोळे लावून फाडफाडून बघूनही आतलं कोणी दिसत नाही, कारण फलाटावर भरपूर उजेड असतो. पण तीच गाडी रात्रीच्या वेळी एखाद्या स्टेशनवर उभी राहिली, तर जिथं दिव्याचा उजेड आहे तेवढ्याच भागातलं अंधुकसं दिसतं. बाकीचं काहीही दिसत नाही. याचं कारण हेच आहे. डब्याच्या खिडकीची काच अशी वनवे मिररसारख काम करत असते.

डॉ. बाळ फोंडके

संकलन – सतीश चिंधालोरे

Share This

1 thought on “पारदर्शी आरसा कसा तयार करतात?”

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.