इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – समसंबंध शब्द (भाग 5) ऑनलाईन टेस्ट – 25
थोडक्यात माहिती :
‘समसंबंध-शब्द’ या उपघटकामध्ये चार पदांपैकी तीन पदांत शब्द दिलेले असतात. यामध्ये भाषेतील शब्द (समानार्थी / विरुद्धार्थी), प्राणी व त्यांचे अवयव, त्यांच्या कृती, त्यांचे गुणधर्म, वस्तू व त्यांचे उपयोग, साधन व साध्य, नद्या, पर्वत, मराठी / इंग्रजी महिने, ऋतू, विविध व्यवसाय, खेळ, जयंत्या, सण, भौगोलिक स्थाने, व्यक्ती इत्यादी परस्परसंबंधित विविध बाबी देऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा शब्द शोधायला सांगितले जाते हे प्रश्न सोडवताना दिलेल्या शब्दांमधील समान संबंध व दिलेले पर्याय विचारात घ्यावे लागतात. या उपघटकाच्या सराव करण्यासाठी ही ऑनलाईन चाचणी सोडवून घ्यावी.
उपयुक्त माहिती :
- आपण विविध विषयांवरील पुस्तकांचे अवांतर वाचन केल्यास, त्यांची शब्दसंपत्ती व सामान्य ज्ञान वाढेल. या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा निश्चितच उपयोग होईल.
- पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध असतो, तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो. परंतु, याउलट म्हणजे चौथ्या पदाचा तिसऱ्या पदाशी असाच संबंध नसतो.
टेस्ट सोडविण्यासाठी शुभेच्छा!
बुध्दिमत्ता ऑनलाईन टेस्ट 25 मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी
- Pos.NameScoreDuration
- 1Aditi Ashok Salve100 %61 s
- 2Vaishnavi100 %67 s
- 3Sakshi100 %99 s
- 4Siddhi dattatray Mahajan70 %84 s
- 5Sakshi70 %113.75 s
- 6Barve Samikasha70 %155.25 s
- 7Srz63.33 %154.67 s
- 8Tanishka60 %127 s
- 9Tanishka Jadhav60 %251 s
- 10Ramnandan Balu Katore60 %263 s