शब्दांच्या जाती
या लेखात आपण मराठी व्याकरणातील अत्यंत महत्वाचा घटक : शब्दांच्या जाती यावर सविस्तर माहिती पाहणार आहोत. या घटकावर शिष्यवृत्ती परीक्षेत 1 किंवा 2 प्रश्न हमखास विचारले जातात. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार शब्दांच्या पुढील चार जाती इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घेण्यात आलेले आहेत : (अ) नाम (आ) सर्वनाम (इ) विशेषण (ई) क्रियाविशेषण
या लेखातील उपघटक :
(अ) नाम
शब्दांच्या जाती यामधील पहिला भाग म्हणजेच नाम आहे.
व्याख्या : कोणत्याही दृश्य दृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात.
उदा. फुले, फळे, पक्षी, प्राणी, नद्या, पर्वत, वस्तू, मुला-मुलींची, देश, धान्ये, ग्रह, नक्षत्र, तारे, गुण, झाडे, गाव इत्यादींची नावे.
खालील नामे वाचा लक्षात ठेवा :
- फुलांची नावे : गुलाब, मोगरा, चाफा, जाई, चमेली, कमळ इत्यादी.
- फळांची नावे : आंबा, चिकू, पेरू, अननस, कलिंगड, पपई इत्यादी.
- पक्ष्यांची नावे : कावळा, चिमणी, पोपट, कबूतर, कोंबडा, मोर इत्यादी.
- वन्य पशूंची नावे : वाघ, सिंह, गाढव, हत्ती, जिराफ, कोल्हा इत्यादी.
- पाळीव पशूंची नावे : गाय, बैल, घोडा, बकरी, म्हैस, कुत्रा, मांजर इत्यादी.
- नदयांची नावे : गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, नर्मदा, सिंधू इत्यादी.
- पर्वतांची नावे : हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरवली, विध्य इत्यादी.
- वस्तूंची नावे : पुस्तक, वही, पेन, घड्याळ, दिवा, टेबल इत्यादी.
- मुलांची नावे : अजय, दीपक, विजय, संदीप, अमर, सुनील इत्यादी.
- मुलींची नावे : सरिता, नलिनी, श्यामला, दीपाली, मेघना, लीना इत्यादी.
- देशांची नावे : भारत, श्रीलंका, कॅनडा, चीन, अमेरिका, मलेशिया इत्यादी.
- धान्यांची नावे : गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, मका इत्यादी.
- ग्रह, नक्षत्रे व ताऱ्यांची नावे : सूर्य, चंद्र, पृथ्वी, रोहिणी, मंगळ इत्यादी.
- काल्पनिक नावे : अमृत, स्वर्ग, परी, परीस, राक्षस, देवदूत इत्यादी.
- गुणांची नावे : सुंदरता, स्वच्छता, दयाळूपणा, शौर्य नम्रता, औदार्य इत्यादी.
- मनाच्या स्थितीची नावे : आनंद, कौतुक, दुःख, ममता, हास्य इत्यादी.
- ऋतूंची नावे : वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर,
- झाडांची नावे : आंबा, फणस, पेरू, जांभूळ, चिच, शेवगा, खैर, साग, बाभूळ, उंबर इत्यादी.
- कीटकांची नावे : डास, माशी, फुलपाखरू, नाकतोडा, मधमाशी इत्यादी.
- राज्यांची नावे : महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान
- जिल्हयांची नावे : सातारा, सांगली, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, बीड, लातूर, धुळे, रলাगिरी
- डाळींची नावे : मूगडाळ, तूरडाळ, मसूर डाळ, उडीद डाळ इत्यादी.
- महिन्यांची नावे : आषाढ, चैत्र, वैशाख, श्रावण डिसेंबर, मे, जून, ऑक्टोबर इत्यादी.
Related Posts :
• शब्दांच्या जाती नाम : नमुना प्रश्न
(1) पुढील वाक्यातील नाम ओळखा:
वाक्य : काय सुंदर देखावा आहे हा!
(1) सुंदर (2) कार्य (3) देखावा (4) हा.
स्पष्टीकरण : वरील पर्यायांत ‘देखावा’ हे दिसणाऱ्या वस्तूचे नाव आहे. म्हणून, पर्याय (3) हे उत्तरआहे.
(2) पुढीलपैकी नाम ओळखा :
(1) भित्रा (2) लबाड (3) धैर्य (4) शूर.
स्पष्टीकरण : वरील पर्यायांत भित्रा, लबाड व शूर ही विशेषणे आहेत आणि ‘धैर्य’ हे नाम आहे; म्हणून पर्याय (3) हे उत्तर आहे.
• सरावासाठी प्रश्न :
प्रश्न 1. पुढील प्रत्येक वाक्यातील नाम ओळखा :
(1) मला त्यांनी वाचनाचा छंद लावला.
(1) मला (2) त्यांनी (3) छंद (4) लावला
(2) आम्ही सर्वजण वाहतुकीचे नियम पाळतो.
(1) नियम (2) सर्वजण (3) आम्ही (4) पाळतो.
(3) सकाळी मी उबदार दुलईतून बाहेर पडले.
(1) दुलई (2) सकाळी (3) मी (4) उबदार.
(4) ते दररोज सकाळी उठल्यावर ईश्वराचे चिंतन करतात.
(1) दररोज (2) सकाळी (3) ते (4) चिंतन.
(5) समशेरबहाद्दर, श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जयजयकार असो!
(1) श्रीमंत (2) समशेरबहाद्दर (3) जयजयकार (4) असो.
प्रश्न 2. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायांपैकी नाम असणारा पर्याय निवडा :
(1) (1) उतारा (2) (1) गर्द (3) (1) भीती (4) (1) कुशल (5) (1) उत्साह | (2) हसरा (2) मर्द (2) भित्रा (2) वाचन (2) वर्णनीय | (3) बोलका (3) गर्विष्ठ (3) डरपोक (3) तज्ज्ञ (3) होतकरू | (4) बावरा. (4) उत्कृष्ट. (4) प्रेमळ. (4) रुबाबदार. (4) प्रापंचिक. |
प्रश्न 3. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायांपैकी नाम नसणारा पर्याय निवडा:
(1) (1) अडचण (2) (1) समुद्र (3) (1) गोडी (4) (1) उदर (5) (1) संधी | (2) वैयक्तिक (2) मासा (2) गोडवा (2) उभय (2) मंदी | (3) मेहनत (3) मीठ (3) गोडपणा (3) उखळ (3) स्वच्छंदी | (4) पदार्थ (4) खारट. (4) गोड. (4) उखाणा. (4) नंदी. |
उत्तरे : प्रश्न 1 : (1) 3 (2) 1 (3) 1 (4) 4 (5) 3 प्रश्न 2 : (1) 1 (2) 2 (3) 1 (4) 2 (5) 1
प्रश्न 3 : (1) 2 (2) 4 (3) 4 (4) 2 (5) 3
(आ) सर्वनाम
शब्दांच्या जाती यामधील दुसरा भाग म्हणजेच सर्वनाम आहे.
• लक्षात ठेवा :
(1) अतुल खूप व्यायाम करतो. (2) तो सुदृढ आहे.
वरील दुसऱ्या वाक्यातील ‘तो’ हा शब्द ‘अतुल’ या नामाऐवजी वापरला आहे. म्हणून…
व्याख्या : नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. वरील दुसऱ्या वाक्यातील ‘तो हे सर्वनाम आहे.
मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, हया, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, स्वत: -ही मराठीतील सर्वनामे आहेत.
(1) मी शाळेत जातो. (2) आम्ही अभ्यास करतो. (3) तू बाजारात जा. (4) तुम्ही घरी या. (5) तो लहान आ (6) ती हुशार आहे. (7) ते निघून गेले. (8) त्यांना घेऊन ये. (9) कोण आले ? (10) काय झाले?
वरील वाक्यांतील अधोरेखित शब्द हे ‘सर्वनामे’ आहेत.
• शब्दांच्या जाती सर्वनाम नमुना प्रश्न
(1) पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याच्या पर्याय-क्रमांकाचे वर्तुळ रंगवा
वाक्य : तिने तिची पेन्सिल हरवली.
(1) तिची (2) पेन्सिल (3) तिने (4) हरवली.
स्पष्टीकरण : वरील पर्यायांत वर वर पाहता ‘तिने’ व ‘तिची’ ही दोन सर्वनामे आढळतात. पण नीट विचार केला, तर ‘तिची’ हे पेन्सिल कोणाची या अर्थाने नामाचे विशेषण आहे, हे लक्षात येते. म्हणून पर्याय (3) हे उत्तर. अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना विशेषण व सर्वनाम यांची गल्लत होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
(2) पुढील वाक्यातील रिकाम्या जागी लिहिण्यासाठी योग्य सर्वनाम निवडा :
वाक्य : रोज योगासने करतो.
(1) ते (2) मला (3) ती (4) मी.
स्पष्टीकरण : वरील वाक्यातील ‘करतो’ हे क्रियापदाचे रूप पाहता, पर्यायांपैकी ‘मी’ हे सर्वनाम योग्य ठरते. म्हणून पर्याय (4) हे उत्तर.
• सरावासाठी प्रश्न :
प्रश्न 1 : पुढील प्रत्येक वाक्यातील सर्वनाम ओळखा :
(1) त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली.
(1) त्यांनी (2) सविस्तर (3) प्रसिद्ध (4) केली.
(2) खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते; पण ती शोधावी लागते.
(1) गुणवत्ता (2) असते (3) शोधावी (4) ती.
(3) त्याच्या पैशाला पाय फुटले.
(1) फुटले (2) पाय (3) त्याच्या (4) पैशाला.
(4) ‘तुला आणखी काही हवे असल्यास सांग.’
(1) काही (2) आणखी (3) हवे (4) असल्यास.
(5) ‘यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही.’
(1) शिकार (2) यापुढे (3) करणार (4) प्राण्याची.
उत्तरे : प्रश्न 1 : (1) 1 (2) 4 (3) 3 (4) 1 (5) 2
(इ) विशेषण
शब्दांच्या जाती यामधील तिसरा भाग विशेषण आहे.
• लक्षात ठेवा :
पुढील शब्दांच्या जोड्या नीट वाचा व ठळक शब्दांकडे लक्ष दया :
(1) भव्य इमारत (2) उंच पर्वत (3) हिरवी पाने.
वरील प्रत्येक शब्दाच्या जोडीतील ठळक शब्द हा त्याच्यापुढे येणाऱ्या नामाविषयी अधिक माहिती सांगतो.
(1) भव्य इमारत (इमारत कशी? – भव्य)
(2) उंच पर्वत (पर्वत केवढा? – उंच)
(3) हिरवी पाने (पाने कशी? – हिरवी)
म्हणजे, ‘भव्य, उंच, हिरवी’ हे शब्द अनुक्रमे ‘इमारत, पर्वत, पाने’ या नामांबद्दल विशेष माहिती सांगतात.
व्याख्या : नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. वरील शब्दांच्या जोड्यांतील ‘भव्य, उंच, हिरवी’ ही विशेषणे आहेत.
• शब्दांच्या जाती विशेषण नमुना प्रश्न
(1) पुढील ठळक अक्षरातील नामासाठी योग्य विशेषणाची निवड करा:
आवाज : (1) सतेज (2) मुत्सद्दी (3) चलाख (4) मंजुळ.
स्पष्टीकरण : आवाज या नामाला ‘सतेज, मुत्सद्दी, चलाख’ ही तिन्ही विशेषण लागू पडत नाहीत. आवाज- मंजूळ, कर्कश, गोड असतो, म्हणून मंजुळ आवाज हे योग्य विशेषण आहे. म्हणून पर्याय (4) हे उत्तर आहे.
(2) ‘पुस्तके नवनवीन गोष्टींची माहिती देतात.’ या वाक्यातील विशेषण ओळखा.
(1) पुस्तके (2) नवनवीन (3) गोष्टींची (4) माहिती.
स्पष्टीकरण : वरील वाक्यात ‘पुस्तके, गोष्ट व माहिती’ ही नामे आहेत, तर ‘देतात’ हे क्रियापद आहे. ‘नवनवीन’ हे ‘गोष्टींची’ या नामाचे विशेषण आहे. म्हणून पर्याय (2) हे उत्तर आहे.
(3) नामासाठी योग्य विशेषणाची निवड करा :
————– चित्र.
(1) रंगवले (2) झुबकेदार (3) सुंदर (4) आळशी.
स्पष्टीकरण : वरील पर्यायातील ‘झुबकेदार’ व ‘आळशी’ ही दोन्ही विशेषणे इथे लागू होत नाहीत. ‘रंगवलें हे क्रियापद आहे. चित्राला ‘सुंदर’ हे विशेषण योग्य ठरते आहे. म्हणून पर्याय (3) हे उत्तर आहे.
• सरावासाठी प्रश्न :
प्रश्न 1 : पुढील प्रत्येक वाक्यातील विशेषण ओळखा :
(1) सिंग दांपत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला.
(1) मुलगी (2) कविता (3) दुसरी (4) दांपत्य.
(2) आपल्याला सगळ्या मुंग्या सारख्याच दिसतात.
(1) सगळ्या (2) आपल्याला (3) दिसतात (4) मुंग्या.
(3) सुधीर हुशार मुलगा आहे.
(1) सुधीर (2) मुलगा (3) आहे (4) हुशार.
(4) नदीनाल्यांतल्या ओल्या वाळूत, मातीत वाघाचे ठसे आढळतात.
(1) वाळूत (2) मातीत (3) ओल्या (4) ठसे.
(5) बघता बघता सारी वस्ती गोळा झाली.
(1) सारी (2) गोळा (3) वस्ती (4) बघता.
उत्तरे : प्रश्न 1 : (1) 3 (2) 1 (3) 4 (4) 3 (5) 1
(ई) क्रियापद
शब्दांच्या जाती यामधील चौथा भाग म्हणजेच क्रियापद आहे.
• लक्षात ठेवा :
पुढील वाक्ये वाचा आणि ठळक शब्दांकडे नीट लक्ष दया :
(1) मी अन्न खातो. (2) मी पाणी पितो. (3) मी अभ्यास करतो.
वरील ठळक शब्दांमधून कोणती ना कोणती तरी क्रिया स्पष्ट केली आहे.
उदा. (1) खातो-खाण्याची क्रिया.
(2) पितो-पिण्याची क्रिया.
(3) करतो- करण्याची क्रिया.
‘खातो, पितो, करतो’ हे क्रिया दाखवणारे शब्द आहेत आणि ते वाक्याचा अर्थही पूर्ण करतात.
व्याख्या : वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात.
वरील वाक्यांतील ‘खातो, पितो, करतो’ ही क्रियापदे आहेत. बहुतेक वेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते, परंतु काही वाक्यांत ते मध्येही येऊ शकते.
पुढील दोन वाक्ये पाहा :
(1) एखाद्या कामाचा पिच्छा पुरवावा तेव्हा कुठे यश लाभते. या वाक्यात क्रियापद शेवटी आहे.
(2) सापडली एकदाची माझी वही. या वाक्यात क्रियापद सुरुवातीला आहे.
• शब्दांच्या जाती क्रियापद नमुना प्रश्न :
(1) पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा:
वाक्य : अवघड झाले आता सगळे.
(1) आता (2) झाले (3) अवघड (4) सगळे.
स्पष्टीकरण : वरील वाक्यातील क्रियापद शेवटी नाही; ते मध्येच आहे. वरील वाक्याला ‘आता सगळे अवघड झाले’, असे मनात करून घ्यावे व क्रियापदाच्या पर्याय-क्रमांक निवडावा.
(2) पुढील वाक्यात योग्य क्रियापद वापरा:
वाक्य : कष्ट करणारी मुले आपल्या आयुष्यात प्रगती
(1) करतो (2) केली (3) करतात (4) करेल.
स्पष्टीकरण : वरील सर्व शब्द क्रियापदे आहेत. परंतु क्रिया करणारा कोण? त्यानुसार लिंग, वचन या लक्षात घेतल्या तर ‘करतात’ हे क्रियापद योग्य वाटते. म्हणून, पर्याय (3) हे उत्तर आहे.
• सरावासाठी प्रश्न :
प्रश्न 1 : पुढील प्रत्या प्रश्नातील रिकाम्या जागी कंसात दिलेल्या क्रियापदाचे योग्य रूप निवडा :
(1) सेनापती बापट यांनी सफाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर……………… (राबवणे)
(1) राबले (2) राबतात (3) राबवले (4) राबवतील.
(2) गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची, म्हणजे दादांची भेट…………….. (घेणे)
(1) घेतल्या (2) घेतील (3) घेतात (4) घेतली
(3) जखमी मुलीच्या कपाळावर आलेले रक्त पुसून जखमेवर त्याने पट्टी………………… (बांधणे)
(1) बांध (2) बांधतात (3) बांधल्या (4) बांधली.
(4) मंत्र्यांची गाडी थेट वस्तीवर येऊन……………… (थडकणे)
(1) थडकली (2) थडकतात (3) थडकवली (4) थडकतो.
(5) सांबर व काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना…………….. (देणे)
(1) दिली (2) देतात (3) देतो (4) देईल.
उत्तरे : प्रश्न 1 : (1) 3 (2) 4 (3) 4 (4) 1 (5) 2