नाम आणि त्यांचे लिंग
या लेखात आपण मराठी व्याकरणातील अत्यंत महत्वाचा घटक : नाम आणि त्यांचे लिंग यावर सविस्तर माहिती पाहणार आहोत. या घटकावर शिष्यवृत्ती परीक्षेत 1 प्रश्न हमखास विचारला जातो. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार लिंगाचे मुख्य तीन प्रकार आहेत – (अ) पुल्लिंग (आ) स्त्रीलिंग (इ) नपुंसकलिंग
व्याख्या : ज्या नामावरून ते पुरुषजातीचे (नर) आहे की स्त्रीजातीचे (मादी) आहे, हे आपल्याला कळते; त्याला त्या नामाचे लिंग म्हणतात.
पुल्लिंग : ज्या नामावरून पुरुषजातीचा बोध होतो, ते पुल्लिंग असते.
स्त्रीलिंग : ज्या नामावरून स्त्रीजातीचा बोध होतो, ते स्त्रीलिंग असते.
नपुंसकलिंग : ज्या नामावरून पुरुषजातीचा किंवा स्त्रीजातीचा बोध होत नाही, ते नपुंसकलिंग असते.
पुढील वाक्यांतील ठळक नामे पाहा :
(1) रमेश मैदानात आला. (2) तिची वही हरवली. (3) बागेत फुले उमलली.
वरील वाक्यांतील ‘रमेश, वही, फुले’ ही नामे आहेत. आता या नामांचे लिग पाहू या.
रमेश वही फूल | तो – रमेश ती – वही ते – फूल | पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग |
• लिंग ओळखताना कोणतेही नाम प्रथम एकवचनी करावे आणि मगच त्याचे लिंग ओळखावे.
• बहुवचन किंवा आदरार्थी नामाचे लिंग ओळखता येत नाही ते नाम एकवचनी करूनच (म्हणजे तात्पुरता आदर काढून) त्याचे लिंग ओळखावे.
पुल्लिंगी नामाचा उल्लेख तो या शब्दाने केला जातो. स्त्रीलिंगी नामाचा उल्लेख ती या शब्दाने केला जातो. नपुंसकलिंगी नामाचा उल्लेख ते या शब्दाने केला जातो.
उदा. तो घोडा, तो फळा, तो ढग, तो चांगुलपणा – पुल्लिंगी नामे
ती नदी, ती मुलगी, ती लेखणी, ती हुशारी – स्त्रीलिंगी नामे
ते मूल, ते फूल, ते शेत, ते धैर्य – नपुंसकलिंगी नामे
(1) काही पुल्लिगी नामांची स्त्रीलिंगी रूपे ठरावीक पद्धतीने होतात.
पु स्त्री. | पु स्त्री. | पु स्त्री. |
माळी – माळीण देव – देवी तरुण – तरुणी कोकीळ – कोकिळा शिक्षक – शिक्षिका सासरा – सासू | कुत्रा – कुत्री पाटील – पाटलीण चिमणा – चिमणी कोळी – कोळीण गायक – गायिका राजा – राणी | वाघ – वाघीण बालक – बालिका लेखक – लेखिका आजोबा – आजी गवळी – गवळण पती – पत्नी |
(2) काही नामांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्रपणे होतात:
पु. | स्त्री. | पु. | स्त्री. | पु. | स्त्री. |
भाऊ उंट मोर पुरुष | – बहीण – सांडणी – लांडोर – स्त्री | बैल दीर नर पुत्र | – गाय – जाऊ – मादी – कन्या | बोकड वडील बोका नवरा | – शेळी – आई – भाटी/मांजर – बायको |
(3) काही सजीवांची नामे आणि त्यांचे लिंग :
पुल्लिंग | नामे | स्त्रीलिंगी | नामे | नपुंसकलिंगी | नामे |
तो तो तो तो तो तो तो | – मुलगा – कुत्रा – घोड़ा – बैल – मेंढा – चिमणा – रेडा/महिष | ती ती ती ती ती ती ती | – मुलगी – कुत्री – घोडी – गाय – मेंढी – चिमणी – रेडी/म्हैस | ते ते ते ते ते ते ते | – मूल – पिल्लू – शिंगरू – वासरू – मेंढरू – पाखरू – रेडकू |
(4) काही नामे आणि त्यांचे लिंग :
पुल्लिंगी | नामे | स्त्रीलिंगी | नामे | नपुंसकलिंगी | नामे |
तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो तो | – आंबा – चंद्र – भात – अंगठा – बगीचा – वृक्ष – देश – फळा – समुद्र – प्रकाश – डोंगर – सूर्य | ती ती ती ती ती ती ती ती ती ती ती ती | – पपई – चांदणी – भाजी – करंगळी – बाग – फांदी – मातृभूमी – शाळा – लाट – सावली – दरी – मेणबत्ती | ते ते ते ते ते ते ते ते ते ते ते ते | – केळे – चांदणे – वरण – बोट – फूल – झाड – राष्ट्र – पुस्तक – पाणी – ऊन – टेकाड – तेज |
• नमुना प्रश्न
(1) पुढील शब्दगटातील पुल्लिंगी शब्दाच्या पर्याय-क्रमांक निवडा :
(1) पापणी (2) भुवई (3) त्वचा (4) डोळा.
स्पष्टीकरण : पुल्लिगी नामाचा उल्लेख ‘तो’ शब्दाने केला जातो. वरील शब्दगटातील डोळा या नामाचा उल्लेख ‘तो डोळा’ असा करतात; तर उर्वरित तिन्ही नामांचा ती पापणी, ती भुवई, ती त्वचा असा उल्लेख करतात. म्हणून पर्याय (4) हे उत्तर आहे.
(2) पुढील शब्दगटातील स्त्रीलिंगी शब्दाच्या पर्याय- क्रमांक निवडा :
(1) रस्ता (2) वाट (3) मार्ग (4) पथ.
स्पष्टीकरण : स्त्रीलिंगी नामाचा उल्लेख ‘ती’ शब्दाने केला जातो. वरील शब्दगटातील वाट या नामाचा उल्लेख ‘ती वाट’ असा करतात. उर्वरित नामांचा उल्लेख तो रस्ता, तो मार्ग, तो पथ असा करतात. म्हणून पर्याय (2) हे उत्तर आहे.