घटक 2 : तंतोतंत जुळणारी आकृती ओळखा.
सूचना : या प्रश्नप्रकारात प्रश्नआकृतीशी संपूर्णपणे तंतोतंत जुळणारी आकृती दिलेल्या चार उत्तरआकृत्यांतून शोधायची असते. हुबेहूब जुळणारी आकृती मिळवण्यासाठी ‘ गाळणी ‘ पद्धत वापरावी.
● यासाठी पुढील पायऱ्या किंवा मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवाव्यात :
1. प्रश्नआकृतीमध्ये दिसणाऱ्या मुख्य आकृतीकडे प्रथम लक्ष केंद्रित करा. प्रत्येक उत्तरआकृतीमध्ये ही मुख्य आकृती आढळते की नाही, ते पाहा. ज्या उत्तरआकृत्यांमध्ये ती नसेल, त्या उत्तरआकृत्या वगळा.
2. आता प्रश्नआकृतीमधील मुख्य आकृतीसोबत ज्या लहान आकृती/चिन्हे असतील, त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करा. या आधीच्या सूचना (1) मध्ये काही उत्तरआकृत्या वगळल्या गेल्यामुळे उरलेल्या उत्तरआकृत्यांपैकी अचूक उत्तरआकृती या पायरीवर मिळू शकते.
3. जर मुख्य आकृतीसोबत एकापेक्षा अधिक लहान आकृत्या/चिन्हे असतील, तर एका वेळी एकाच लहान आकृतीवर/चिन्हावर लक्ष केंद्रित करा. उत्तरआकृत्यांमधील इतर अशाच लहान आकृत्यांशी /चिन्हांशी तिची तुलना करा.
वरील सूचनांमुळे उत्तर नसलेल्या आकृत्या एक-एक करीत वगळल्या जातील व तुम्हांला अचूक उत्तराकडे पोहोचता येईल.
तंतोतंत जुळणारी आकृती (Level 3) मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी
- Pos.NameScoreDuration
- 1Vedant Tarone100 %43 s
- 2Rudra Paresh kottewar100 %49.33 s
- 3Kartikey100 %54 s
- 4Gauravi katole100 %58 s
- 5Mihan100 %59 s
- 6Yash gaykwad100 %63 s
- 7Ishan100 %71 s
- 8Divya sambhaji bansode100 %77 s
- 9Vedant hatwar100 %79 s
- 10Tanuja Dagdoji Bhosle100 %80 s
Good sir