कल्चर्ड मोती कसे तयार करतात ?

आपले सारे अलंकार खनिजांपासून बनलेले असतात. सोनं, चांदी यासारखे धातू खनिजांमधूनच मिळतात आणि हिरे, माणकं यांच्यासारखी रत्नं म्हणजे तर खनिजंच. हिरा हा तर कोळशाचाच भाऊ. याला अपवाद म्हणजे मोती. हे आभूषण मात्र प्राणिज आहे. शिंपल्यांमध्ये असणाऱ्या कालवांपासून आपल्याला मोती मिळतात.

कालवं द्विदल असतात. म्हणजे ती ज्या शिंपल्यात वावरतात त्यांची दोन पाळी असतात. ही दोन पाळी एकमेकांना चिकटलेली असली तरी त्यांचं तोंड उपई असतं. आपलं खाद्य मिळवणं त्यामुळे कालवांना सहज शक्य होतं. ते मिळणारं अन्न खाऊन खाऊन जशी कालवांची वाढ होत राहते. तसंच मग त्यांचं घर असलेल्या शिंपल्याचीही वाढ व्हावी लागते.

कालवांच्या शरीराचाच एक अवयव असलेल्या मॅन्टलकडे ही कामगिरी सोपवलेली असते. याच मॅन्टलकडून नॅकर नावाचा एक पदार्थ तयार केला जातो. शिंपल्याच्या आतल्या बाजूला जे चकचकीत अस्तर दिसतं ते या नॅकरचंच बनलेलं असतं. त्याला मदर-ऑफ-पर्ल, मोत्याची आई असंही म्हणतात. उघड्या तोंडातून कालवांचं खाणंच तेवढं आत शिरेल असं नाही. काही वेळा एखादा मातीचा कण किंवा असंच काहीतरी कुसळही आत शिरतं.

मग त्याच्यापासून बचाव करण्यासाठी मॅन्टलकडून नॅकरचा वाढीव पाझर होतो आणि त्या कणाला वेढून टाकतो. त्याच्यावर त्याचं आवरण बसत जातं. ते वाढत जाऊन मग त्याचाच मोती बनतो. म्हणून तर नॅकरला मोत्याची आई म्हणतात. ही झाली मोती तयार होण्याची नैसर्गिक प्रक्रिया. याचीच नक्कल करून कल्चर्ड मोती तयार केले जातात. वैज्ञानिक भाषेत कल्चर म्हणजे संवर्धन प्रक्रिया, म्हणून तर कृत्रिम पद्धतीनं वनस्पतींची रोपं बनवण्याच्या प्रक्रियेला प्लान्ट टिश्यू कल्चर म्हणतात. किंवा प्रयोगशाळेत जिवाणूंची वाढ करण्याच्या प्रक्रियेला बॅक्टिरियल कल्चर म्हणतात.

दही तयार करताना जे विरजण आपण घेतो तेही त्या दह्याच्या निर्मितीला चालना देणाऱ्या लॅक्टोबॅसिलस या जिवाणूंचं कल्चरच असतं. तेव्हा कल्चर्ड मोत्यांमध्ये अशीच संवर्धनाची प्रक्रिया वापरण्यासाठी त्या मॅन्टलला डिवचलं जातं व एखादा मातीचा कण शिंपल्याच्या आत सोडला जातो.

डिवचलेल्या मॅन्टलला, हा आपोआप आत शिरलेला कोणी परकीय कण आहे की जाणूनबुजून आत शिरलेला घुसखोर आहे, याचा निवाडा करता येत नाही. ते त्या परकीयाचा बंदोबस्त करण्यासाठी त्याच्याभोवती नंतरचं जाळं विणणे टाकतं आणि आपल्या पदरात मोत्याला टाकतं. आत टाकलेल्या कणाचा आकार हवा तसा निवडून मोठ्या आकाराचे कल्चर्ड मोती मिळवणं म्हणूनच शक्य होतं.

How are cultured pearls made?

All our ornaments are made of minerals. Metals like gold and silver are found in minerals and gems like diamonds and rubies are found in minerals. The diamond is the brother of coal. The exception to this is pearls. This ornament, however, is animal. We get pearls from the canals in the mussels.

The canals are dichotomous. This means that the mussels in which they live have two shifts. Although these two shifts are sticking to each other, their mouths are upside down. This made it easier for the canals to get their food. The canals continue to grow as they eat the food they get. Also, the mussels that have their home have to grow.

Then there is the increased penetration of the knocker from the mantle to protect it and encircle that particle. His covering is getting on him. It grows and then becomes its own pearl. So the knocker is called the mother of pearls. This became the natural process of pearl formation. Cultured pearls are made by imitating this. In scientific parlance, culture is the process of cultivating, so the process of making plants by artificial means is called plant tissue culture.

The fermentation that we take in making yoghurt is also the culture of the bacteria called Lactobacillus which promotes the production of yoghurt. In cultured pearls, the mantle is peeled off and a clay particle is released inside the mussel.

संकलन – सतीश चिंधालोरे

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.