घटक 7 : आरशातील प्रतिमा ओळखणे. (Level 4)
सूचना : या प्रश्नप्रकारात प्रश्नआकृतीचे आरशातील प्रतिबिंब कसे दिसेल, हे शोधायचे असते. यासाठी पुढील पायऱ्या किंवा मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवाव्यात :
1. मुख्य प्रश्नआकृती लक्षात घ्या. प्रतिबिंबात तिची उजवी बाजू डावीकडे दिसते, तर डावी बाजू उजवीकडे दिसते. असे पर्याय निवडून इतर पर्याय वगळा.
2. प्रश्नआकृतीत असलेली इतर चिन्हे लक्षात घ्या. डावीकडे असलेले चिन्ह प्रतिबिंबात उजवीकडे दिसते. तसेच, उजवीकडचे चिन्ह प्रतिबिंबात डावीकडे दिसते. चिन्हाची डावी व उजवी बाजू यांच्यातसुद्धा अदलाबदल होते.. चिन्हाच्या आकारात बदल होत नाही. यानुसार, 1 मध्ये निवडलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून इतर पर्याय वगळा. या पायरीवर उत्तर मिळण्याची शक्यता असते.
3. प्रश्नआकृतीच्या वरच्या व खालच्या बाजूंना असलेले चिन्ह प्रतिबिंबात त्याच ठिकाणी दिसते. मात्र चिन्हाची उजवी व डावी बाजू यांच्यात अदलाबदल होते. यानुसार, 2 मध्ये निवडलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
4. प्रश्नआकृतीचे डावीकडे झुकलेले चिन्ह प्रतिबिंबात उजवीकडे झुकलेले दिसते, तर उजवीकडे झुकलेले चिन्ह प्रतिबिंबात डावीकडे झुकलेले दिसते.
वरील पायऱ्यांचा अवलंब केल्यास, उत्तर नसलेले पर्याय एक-एक करून वगळले जातील व तुम्हांला अचूक उत्तराकडे पोहोचता येईल.
घटक 7 : आरशातील प्रतिमा ओळखणे. (Level 4) मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी
- Pos.NameScoreDuration
- 1Kartikey100 %52 s
- 2Aditya Ramdas Billary100 %55 s
- 3kailashbhelawe3387@gmail.com100 %60.5 s
- 4Krutika Hatwar100 %62 s
- 5Lushant100 %65 s
- 6Shreya100 %78 s
- 7Addhey100 %79 s
- 8Vidhi Rajendra kayastha100 %79 s
- 9Shruti babar100 %79.5 s
- 10Lawannya bhelawe100 %80.5 s